Author Topic: दु:खांसोबत जगायला शिक....  (Read 1024 times)

हसायला शिक
जगायला शिक
उघड्या डोळ्यांनी दु:ख लपवुन
समोर जाऊन लढायला शिक

कुणी नाही ईथे कुणाचे
जिवाची तुझ्या किंमत करायला शिक

आपले म्हणायला रक्तही आपलेच
वाहुन गेलेल्या रक्ताला विसरायला शिक

काळजाला सारेच देतात वेदना
वेदनांसोबत तु मरायला शिक

कितीही स्वप्न तुटले तुझे
चंद्रासारखे मोठं मन करायला शिक.....

दु:खांसोबत तु जगायला शिक......
-
©प्रशांत डी शिंदे