Author Topic: आयुष्याचेही रंग अनेक आहेत..  (Read 1214 times)

आयुष्याचेही रंग अनेक आहेत
कधी रंगहीन तर कधी शापित आहे

जगणे असह्य झाले तरी जगतो  इथे
नशिबाचे हे खेळणे आहे

नसतं हातात काहीच  शिल्लक
दुखांनीच घेरले आहे
क्षणिक गंध येतो सुखांचा
क्षणातच सारेकाही विखुरले आहे ......

देऊन जातो प्रेम अन माया
मरण येउनही तोच  जिवंत आहे

आयुष्य ह्याच नाव  आहे
खडकाळ अंगणातही  लागली सुमने आहे

आयुष्य ह्याचेच  नाव आहे.......
-
©प्रशांत डी शिंदे ....

दि.२१-०४-२०१४