Author Topic: डोळ्यांनीच अश्रूला..  (Read 747 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
डोळ्यांनीच अश्रूला..
« on: April 22, 2014, 11:38:37 AM »
डोळ्यांनीच अश्रूला ढाळू नकोस म्हटले
गालातील ओठांना मात्र ईथे हसू फुटले

भ्रष्टाचाऱ्यांनी ईथे तर चंग बांधला
शिष्टाचाऱ्यांचे तर ईथे पांग फिटले

वसनांची तर ईथे वाघीण फुटली
नग्नतेचे मात्र ईथे वादळ सुटले

भलाईला ना ईथे कुठे आसरा
पाप्यांचे तर ईथे पितर उठले

खोट्यांच्या या बघा हरकती
सत्यतेचे तर ईथे "शील" लुटले 

अश्रूंना ना ईथे वाट मोकळी
टिंगल टवाळ्यांचे मात्र ईथे पेव सुटले

श्री प्रकाश साळवी दि. २२ एप्रिल २०१४ .  ???

Marathi Kavita : मराठी कविता