Author Topic: अडगळीतल्या खोलीत ..  (Read 953 times)

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
अडगळीतल्या खोलीत ..
« on: April 22, 2014, 03:51:19 PM »
अडगळीतल्या खोलीत ...
.
अडगळीतल्या खोलीत जेव्हा
जुनी वही सापडते
भुतकाळतल्या स्वप्नांमधे तेव्हा
माझी अठवण पुन्हा बागडते
.
ते खाकी रंगाच कव्हर
त्यावर पुसट दिसणारं ते नाव
हात फिरवता जेव्हा त्यावर
अठवत गोड स्वप्नांच ते गाव
.
मग मी ...
मग मी.
हळूच पाने ऊलटू लागतो
वहीतले अक्षर बोलू लागतात
बोलक्या जुन्या अक्षरा सोबत
माझ्या अठवणी चालू लागतात
.
पुसट कविता ही तिथे दिसते
पुसट चिञे ही तिथे दिसते
सह्यांचे भरलेले पान पाहून
खळी गालातच तेव्हा बसते
.
तेवढ्यात कोठून तरी एक
तेवढ्यात कोठून तरी एक
एक जूना फोटो हाती लागतो
फोटो नजरे समोर घेऊन
मी तो फोटो निरखू पाहतो
.
मग ..
मग हळूच धडधड व्हयला लागते
गालात हसूच यायला लागते
जुन्या फोटोतली ती तरूणी
नव्याने माझ्याशी बोलालला लागते
.
तरूणी ...
चेतन विसरलास का रे मला ??
ईतका विसराळू कधी पासून झालास
या अडगळीच्या खोलीत
आज काय मला भेटायला आलास. ?
.
मी ..
खरं तू अशी पुन्हा भेटशील
मला असं कधीच नव्हत ग वाटलं
तुला ईथ असं पाहून
सुखा:च आभाळ मनात ग दाटलं
.
ती ..
मी तर तुझ्या प्रतिक्षेतच होते रे
पण तूला माझी प्रतिक्षा कोठून असणार
जिथे जिवनच दुसरी सोबत वाटल
तिथे माझ्या वाट्याला काय असणार
.
मी ..
पुन्हा भांडण करायच का ग तूला
पुन्हा रडवणार का आता मला
सोडून पुन्हा त्याच ऊंबरठ्यावर
दुखा:त घडवणार का आता मला
.
ती ..
क्षमा कर रे मला
चुकी माझी पण तेव्हा होती
तुला मिळवण्या साठी मला
तोडावी लागणार होती रे सर्व नाती
.
तेव्हा
बोलणार तिच्या सोबत मी
तेवढ्यात मागून कोणीतरी आवाज देतं
काय करताय तूम्ही ईकडे ??
असं बोलून खोलीच्या बाहेर मला नेतं
.
लपवून वही पाठीमागे मी
डोळ्यातलं पाणी मी सावरलं
मौन ओठांवरती ठेवून
तिथल्या परीस्थीतीला मी आवरलं
.
तेव्हा जेथून घेतली होती मी ती वही
पुन्हा तेथेच ठेऊन मी दिली
पुन्हा भेटायला यायचे वचन
तिची अठवण माझ्या कडून घेऊन गेली
.
मी हि तिला वचन दिले
तुला पुन्हा भेटायला मी येणार
पुन्हा जुन्या अठवणीं सोबत
पुन्हा नव्या स्वप्नात तूला नेणार ..
.
©  चेतन ठाकरे
दि : 21-4-14

Marathi Kavita : मराठी कविता


Re: अडगळीतल्या खोलीत ..
« Reply #1 on: April 23, 2014, 12:56:33 PM »
chan .... :)

Jawahar Doshi

 • Guest
Re: अडगळीतल्या खोलीत ..
« Reply #2 on: April 20, 2016, 11:59:28 PM »
Khupach Chaan

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: अडगळीतल्या खोलीत ..
« Reply #3 on: May 18, 2017, 11:31:14 PM »
धन्यवाद :)