Author Topic: ठरवले आहे मी विचार नाही करायचे ....  (Read 920 times)आता ठरवले आहे   मी  विचार नाही करायचे
हरवून जाऊन तयांत आपण नाही झुरायचे
.
जगावे हे आयुष्य घेऊन थोडा  मोकळा श्वास
झालंय हे मन दूषित वारंच  आहे विचारांचे 
.
मी बळी नाही पडायचे ठरवले आहे पक्के
खचून जातो माणूस राहत नाही कुणाचे
.
मनात ध्यानात नसतं काही
घरात भासही होतात विचारांचेच
डोळ्यांसमोर दिवसाही अंधार दाटतो
मग भूकही पोटातच रडते
प्रश्नच आहे विचारांचे
उत्तर थोड्यांनाच सापडतात
इच्छा तेव्हा एकच मला आता मरायचे ..........
.
कित्येक आहेत रुग्ण ह्याचे
त्यावर  नाही तोडगा
नशिबाचा बळी कुणी तर कुणी बळी आहे   धोक्याचा
कुणी घालतो साकडे देवाला
कुणी नशिबालाच दोष देतो
वाढलेल्या ताटातही  त्याला विचारांचेच भोजन दिसतं..........
.
आता मात्र  खूपच झालं
कसे निवांत बसायचे
ठरवले आहे प्रेमानेच आता विनवणी त्याला घालायचे ........
.
जाऊ दे रे बाबा आता
सोडून दे माणसाला
करून विचार बघ मुकतो आहे जो तो जीवाला
निघून जा दूर कुठे तू
उत्तर बनूनच भेट दुखांचे
आनंद मिळेल गरिबाला ह्या
हात उठतील  मग आशीर्वादाचे .............

सोडून दे ह्या मनाला
घर मोकळे ठेव विचारांचे ............
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.२३-०४-२०१४