Author Topic: मल्ले तर लग्न च नाय करायचं बोल.........  (Read 789 times)

Offline Shrikant.Gondhali

  • Newbie
  • *
  • Posts: 1
मल्ले तर लग्न च नाय करायचं बोल......... 8)

"मले दुसरा पोरगा आवडतो पण त्यो आमच्या जातीचा न्हाय
माझ्या बाला येगला च आवडतो तो आमच्या जातवाला हाय
कह्याले कुंडली बघता तुमी मंगळ पत्रिकेत आपण तर पृथ्वीवर न
मग म्या पृथ्वीवर उभी राहून थोडा शहाणपणा केला तर काय बिगडतय....
दोन वरीस झाल...म्हातार पोर शोधून आणत आणि मी त्यानले नाय बोलते
आता त्या पोरांचा दोस न्हाय मीच अतिशाहानी हाव न
बापाले माझ म्हणन पटत नाय नि मले बापाचं....
मला शिकविल त्याने जनम दिला म्हणून काय सार त्याच ऐकायचं
म्या तर भंगलेली आता सावरू कसा महा तोल
कुणी कुणी तर हुंड्यामध्ये इचार्तोय मले माझे मोल
पाण्यातला बगळा नि जमिनीवरची बगळी
लोक मले कंपनीतली इचारत आहे सगळी
म्या म्हणते म्या
ह्यो असा किती दिस बडवू मी ढोल
मल्ले तर लग्नच नाय करायचं बोल .......!! "
मुलीची/मुलाची इच्छा नसताना मानसन्मानाच्या ओझ्याखाली लग्न लावणारे पालक एक नंबरी आणि तोंडाला कुलूप लावून सावरा सावर करणारी मुलगी/मुलगा दस नंबरी.....लाचार ! पण या सगळ्यात ज्याच्याशी किंवा जिच्याशी अशी व्यक्ती लग्न करते...त्याचा दोष काय ??
माणसांन कस रोख ठोक असाव...आतून बाहेर नि बाहेरून आत - सेम to सेम ! देखावे गणपतीत चांगले वाटतात दहा दिवस तेवढे !


शब्द - श्रीकांत गोंधळी
https://www.facebook.com/shrikant.gondhali
« Last Edit: April 26, 2014, 04:31:50 PM by Shrikant.Gondhali »