Author Topic: यशश्री...  (Read 722 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
यशश्री...
« on: May 05, 2014, 10:44:45 AM »
      यशश्री...

हात घालता कार्यात मी ,
यशश्री मज लाभावी ।
सुदैवाची भेट व्हावी,
दूर्दैवाला जागा नसावी ।
सगळे हूक्मी एक्के असावे हाती,
नको गुलाम कोणाचा ।
सगळे व्हावे मना सारखे,
ईच्छा राहू नये अपूरी ।
सुखाची व्हावी मैञी माझी,
सोबत लाभावी अनंत काळाची ।
सदैव विजयी होत राहावे,
पराजयाची सावली नसावी ।

« Last Edit: May 08, 2014, 04:40:20 PM by SONALI PATIL »

Marathi Kavita : मराठी कविता