Author Topic: कवडसा.....  (Read 1100 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कवडसा.....
« on: May 08, 2014, 10:10:04 AM »


!! कवडसा !!

हाका येतील घेऊन सुगंध
मार्ग सावध चाला कटयाचा,
राहतो गुंतत त्यातच आपण
भान विसरून सारे जगताचा !!

गूढ शोधिता होतो धूसर
कसा आरसा हा कर्माचा,
भास देतो कधी कवडसा
नाही पथिक तो या वाटेचा !!


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता