Author Topic: वर्ष अखेरी लोक विसरतीलं  (Read 534 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
 वर्ष अखेरी लोक विसरतीलं
दगड एक ते नवा शोधतीलं
 
...................................धर्म जळूद्या तो देव वाचवा 
...................................लोक ओरडा असाच करतीलं
 
...................................देव आपला सांभाळतील पण   
...................................मूर्ती दुसर्या सहज फोडतीलं
 
टि आर पीचे हिशेब जुळवण्या
बुडती मूर्ती रोज दावतीलं
 
...................................पाथरवट हे मीडीयावाले
...................................दगड एक ते नवा तासतीलं
 
...................................राकट कणखर दगडांच्या देशी
...................................नव्या नव्याने मूर्ती घडतीलं
 
माई, अण्णा, अन सचिन झाहले
एक नवा ते देव घडवतीलं
 
...................................निवडणुकांच्या खेळात रंगुनी 
...................................नमो नमो ते बघा बोलतीलं
 
...................................वर्ष अखेरी लोक विसरतीलं
...................................दगड एक ते नवा शोधतीलं
 
(सचिन retire झाला तेंव्हा सगळी कडे त्याची इतकी हवा होती की जणू आता Indian cricket ला काही भविष्यच उरलं नाही. जे सचिनचे चाहते होते त्यांना सचिनचे गुणगान गाण्याशिवाय आणि जो त्याच्या विरोधात बोलेल त्याच्यावर तोंडसुख घेतल्या शिवाय चैन पडत नव्हते. सचिनच असं नाही पण बर्याच जणांच्या बाबतीत आपण असेच भावनेच्या लाटेवर स्वार होत असतो.  ही कविता मी सचिन retire झाला तेंव्हा त्याच दिवसांत लिहिली आहे.)
 
केदार...