Author Topic: दुखाची कथा आज डोळ्यांतुनी घे वाचुनी ..........  (Read 917 times)

कोसळली ती रात्र
चांदण्यांच्या भांडणात
एकाच चंद्र एकटाच
राहिला पाहत कोपरयात

वाऱ्यानेही घेतली माघार
आभाळाचेच   का ऐकायचे मी आज
न कारण न कसलाच वाद होता
प्रेम केलं हाच तो गुन्हा होता

आली ती लाट कशीतरी
किनारयावरच जरा विसावली
दुखांपासून दूर व्हायचे म्हणून
वाळूमध्ये   ती सामावली

दुखाची कथा आज डोळ्यांतुनी घे वाचुनी ..........
-
©प्रशांत डी शिंदे