Author Topic: शब्द  (Read 946 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
शब्द
« on: May 21, 2014, 11:37:50 AM »
शब्द खूप अनमोल असतात
कधी अनोखे तर कधी आपल्यासाठीच वाटतात
शब्द कधी डोक्यात जाऊन पेटतात
तर कधी भावनेच्या बाजारी भेटतात

शब्दांनी कित्येकाच्या जिंदग्या तुटतात
शब्दांनीच माणसं रोज-रोज भेटतात
शब्दांच्याच नादाने कोणाशी भांडतात
शब्दाच्याच साथीने डोळेपण भरुन येतात

शब्द कधी गर्दीत एकट पाडतात
शब्दच एकट असताना मनात गर्दी करतात
शब्दानेच जोडतात कित्येक नाती
शब्दच तोडतात कित्येक दिव्यातल्या वाती

शब्दच देतात दुखलेल्यांना आधार
शब्दानेच येतो शिक्षणाला आकार
शब्द हे असतात वार्यासारखे मोकार
मिसळुन आपल्यात करतात आपलीच शिकार

-S.S.More-

Marathi Kavita : मराठी कविता


Offline dipak chandane

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
Re: शब्द
« Reply #1 on: June 01, 2014, 11:38:56 AM »
nice...........