उंचावरुनी तो,
पहात होता सारे
आभाळ ठेंगणे
मुठीत घेऊन तारे
अंधार जाळूनी
उजळत प्रकाश वाटा
अंधुक त्यातूनी
तप्त धुराच्या लाटा
केशरी, हरा, आकाशी
पांढरा रंग
भिरभिरत्या वा-यावरी
थरथरे अंग
सरताज मिरवतो
उग्र विजांचा माथा
अंधुक त्यातूनी
तप्त धुराच्या लाटा
आतषबाजी भोवती
अनोखी चाले
ते अग्निबाण ही
काळीज कापत गेले
जल्लोष, आणि उत्साह
विसरुनी चिंता
अंधुक त्यातूनी
तप्त धुराच्या लाटा
शोभिवंत कुणी, तो
दिवाळी कंदिल नव्हता
जो सहज कुणि
टांगावा येत जाता
अविरत करतो तो
स्वातंत्र्य लक्ष्मी ची पूजा
सरहद्दी वरचा...
शौर्य सूर्य तो होता
सरहद्दी वरचा... शौर्य सूर्य तो होता !
----------------------------------------------------------------
शब्दशः शब्दशहा !
manndar cholkar.