Author Topic: फेसबुक ...  (Read 1006 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
फेसबुक ...
« on: June 05, 2014, 10:16:06 AM »
फेसबुक ..
.
फेस-बुकाच्या वाँल वरती
गाठले मी काल तिला
करून रिक्वेस्ट एक्सेप्ट माझी
नोटीफाय केले तिने मला
.
देऊन मी एक कमेंट तिला
अटेंशन क्रिएट मी केले
देऊन लाईक कमेंट ला माझ्या
ऊत्तर कमेंट ने तिने दिले
.
तिच्या प्रत्येक पोस्ट ला लाईक देत गेलो
प्रत्येक पोस्ट वर कमेंट देत गेलो
तिच्या कडून येणारया प्रत्येक पोस्ट वर
स्वत:ची अठवण सोडत गेलो
.
ति ही रिप्लाय देतच गेली
कमेंट, लाईक्स करत गेली
प्रत्येक पोस्ट वर माझ्या ती
छाप तिची ती सोडत गेली
.
मग मी ही ईंटरेस्ट घेतच गेलो
तिची प्रोफाईल चेक करतच गेलो
दिसला नाही तिथे फोटो तिचा
छोट्या संभ्रमावर जिव जडवत गेलो
.
व्हर्चूअल वर्ल्ड मधे मी वाहत गेलो
स्वप्नात तिला मी पाहत गेलो
एक एक क्षण अनूभवत मी
प्रेमात तिच्या मी जाहतच गेलो
.
ठरवून मनाशी मी केला निर्धार
प्रेमाच प्रपोजल माझ्याकडून देणार
व्हिजीट करता प्रोफाईल जेव्हा तिची
स्टेट्स एन्गेज पाहून तिचे
स्वत:हून घेतली मी माघार ..
.
.
©  Çhex Thakare

Marathi Kavita : मराठी कविता