Author Topic: वारा..  (Read 563 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
वारा..
« on: June 05, 2014, 02:58:00 PM »
कधी मुकाट्याने तर कधी सोसाट्याने
वाहतो कधी त्सुनामी तर कधी वादळाच्या रुपाने
येतो ढगांना घेऊन कधी दूर जातो
अचानक ढगांना सोबत घेऊन सरीही कोसळतो
वारा कधी अंगालाच झोंबतो
 वार्याच्या नसण्याने उन्हातही भिजतो
वार्यामुळेच गर्मीत मन विसरुन काही
 झुळकीने मन हरवून जाते
वार्याच्या साथीने ढगही कोसळतात
समुद्रातही जहाजे वार्यामुळेच फिरतात
वार्यामुळेच पडते भितीला भेग
वार्यामुळेच येतो उडणार्या फुग्यालाही वेग..

..

Marathi Kavita : मराठी कविता