Author Topic: पाऊस रात्रीचा..  (Read 840 times)

Offline Rohit Dhage

  • Jr. Member
  • **
  • Posts: 221
  • Gender: Male
  • Show me the meaning of being lonely....
पाऊस रात्रीचा..
« on: June 08, 2014, 12:57:00 PM »
बारीकशी रिमझिम बाहेर पावसाची
जमिनीवर पडणारे पावसाचे सततचे थेंब
अन मधूनच उमटणारी गडगडाटाची चाहूल
पावसाळा चालू झाल्याची पुसटशी कल्पना
मी वाट पाहत असतो कायम या पावसाची
सोबत घेऊन येणाऱ्या खोलवर नेणाऱ्या क्षणाची
स्वत:शीच थोडं बोलणं, खोलवर पाहणं होऊन जातं
चार गोष्टी समजून थोडं उमजनं होऊन जातं
धावपळ चालू असतेच तशी आपली तेवढी कायम
पण एक निवांत उसासा हा पाऊस देऊन जातो
जवळ असेल त्याला थोडी उसंत देऊन जातो
जवळ कुणी नसल्याची कधी खंत देऊन जातो
हा पाऊस कायम असावा असं एकदा वाटून जातं
चार क्षण सुखाचे माणूस आपल्यात गढून जातो
अन रात्रीच्या वेळी हा पाऊस असा पडावा
खोलवर मनाशी जसा पाण्याच्या शिडकावा
सोबतीला असावी रातकीड्यांची वस्ती
आणि मनाला रिझवेल मग हलकीशी सुस्ती
पण एक पाऊस मात्र कधी असाही वाटतं पडावा

जो कुणालातरी आठवून कधी आपल्यासोबत रडावा


- रोहित
« Last Edit: June 08, 2014, 01:06:54 PM by Rohit Dhage »

Marathi Kavita : मराठी कविता