Author Topic: अकुंर मुलीचा  (Read 921 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
अकुंर मुलीचा
« on: June 18, 2014, 10:00:43 AM »
अकुंर मुलीचा

कुशीत तुझ्या अंकूरला
अंश तुझ्या स्ञीत्वाचा,
ऊबेत तुझ्या वाढू दे
स्ञीत्वाला अस्तीत्व दे ।
लढाई आहे तुझी
तुच तिला साथ दे ।
अपमान करू नको कुशीचा,
कुस तुझी उजळू दे ।
दिशा दे तिला,सावली बन तिची
तलवारीला धार देउन,
ढाल बन तिची ।
लढाई आहे स्ञीत्वाची,
अस्तीत्व दे तिला ।
अंबा,दुर्गा,लक्ष्मीबाई
बनु दे तिला ।
स्ञीत्वाची कळी ऊमलू दे ,
छाटू नको तिला ।
तिच्या शस्ञानां धार दे
तिच्या पंखाना बळ दे,
तिची लढाई तुझीच तर आहे,
घरा घरात पनती ऊजळू दे ।Marathi Kavita : मराठी कविता