Author Topic: पाऊस  (Read 4601 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पाऊस
« on: June 19, 2014, 09:45:04 AM »उधळण पाचूंची डोंगर माथी,
गर्द त्यावर मेघांची दाटी,
वाहे तांबूस पाणी चोहीकडे
नदि नाल्यांच्या होई गळाभेटी !

ओहोळ जणू साथ देती
वायुचेही गीत सुरेल नवे,
सुर गोड मंजुळ कानी
प्रसन्नता हि मनास भावे !

उगीच लपत निघतो ‘रवी’
सौंदर्य सभोवार पाहण्या परी,
फसविती मेघ हळूच त्याला
आहे जणू तो त्यांच्या करी !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता