Author Topic: स्वप्न सावली  (Read 1476 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
स्वप्न सावली
« on: June 19, 2014, 10:34:16 AM »रोज सावली मला विचारते
मी तुला शोधत असते...
कुठे जातोस? तू रात्रीचा !
तेंव्हा मी...
फक्त गालात हसतो...

छान गप्पा करतोस
रात्री माझ्या सोबत,
कुठे गायब होतोस? सकाळी!
स्वप्न सुद्धा रोज
असचं काहीस विचारतं !

गालात तो का हसतो?
प्रश्नाचं उत्तर का टाळतो?
सावलीचा प्रश्न स्वप्नाला
एकांतात भेटून एका सांजेला !

जुनी आहे आमची ओळख
नाही, तूला नाही टाळत,
सवय तूला नाही माहित
बसतो तो माझ्याशी खेळत

खेळता खेळता मीच दमतो
जाऊ लागतो हळूच उठून,
दिवसा पुन्हा भेटतो तूला
रात्री माझ्याकडे येतो फिरून !


© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता