Author Topic: घालू कसे तुला साकडे  (Read 730 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
घालू कसे तुला साकडे
« on: June 28, 2014, 10:31:40 PM »
घालू कसे तुला साकडे……………………संजय निकुंभ
============================
घालू कसे तुला साकडे मज काही कळेना
कुठे दडी मारून बसलास आता तरी येना

भेगा पडल्या धरणीवर डोळे लागले तुझ्याकडे
दुष्काळाच्या भीतीने ग्रासले सर्वांना
चित्त नाही थाऱ्यावर कुणाचे आता तरी बरस नां

घालू कसे तुला साकडे मज काही कळेना
कुठे दडी मारून बसलास आता तरी येना

लाहीलाही होतेय अंगाची पाणी आटले धरणातले
पाण्यासाठी वणवण होतेय देव पाण्यात बुडवले
झाली असेल काही चूक क्षमा करून टाक नां 

घालू कसे तुला साकडे मज काही कळेना
कुठे दडी मारून बसलास आता तरी येना

कधी जमतील काळे ढग नजर नेहमी आभाळाकडे
शेतकऱ्यांची दशा पाहूनही पाझर तुज फुटेना
तुझी आस साऱ्या सृष्टीला पावसा तू बरसना

घालू कसे तुला साकडे मज काही कळेना
कुठे दडी मारून बसलास आता तरी येना

रुक्ष झाले झाडे वेली , पक्षांचीही किलबिल थांबली
कवी मनांची प्रतिभा सारी , कुठेतरी हरवून गेली
कोसळ तू आता लवकरी , उदास मनांना फुलव नां

घालू कसे तुला साकडे मज काही कळेना
कुठे दडी मारून बसलास आता तरी येना
=================================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २८. ६. १४  वेळ : ९.५० रा .   Marathi Kavita : मराठी कविता