Author Topic: वितभर पोटासाठी  (Read 1096 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
वितभर पोटासाठी
« on: June 30, 2014, 09:35:41 PM »
वितभर पोटासाठी
==================
जो तो धडपडतोय
मागासवर्गीयात येण्यासाठी
मी हि आहे मागास
हे पटवून देण्यासाठी

काल मागास शब्दाला
वेगळाच अर्थ असायचा
आज तोच सर्वस्व बनलाय
सगळ्याच समाजासाठी

कुणी म्हणतं obc त टाका
कुणी म्हणतं sc , st त टाका
काय बी करू राव आम्ही
आता मागास होण्यासाठी

जमाना खरचं बदललाय
काल मागास नाही म्हणून ताठ मानेने फिरणारे
आज मोर्चे काढताय
मागास म्हणवून घेण्यासाठी

फायदा तोटा पुढचा प्रश्न
श्रेठत्व आता तेच नाकारताय
हे तर कळले आरक्षण आहे
सामाजिक समतोल साधण्यासाठी

आता उरलेले सुद्धा पुढे येतील
श्रेष्ठ कनिष्टाच्या भिंती पडतील
सगळे जाती धर्म नष्ट होऊन
मागास जात उदयास येईल

शेवटी एकच सिद्ध होईल
माणुसकीला अर्थ येईल
सारे एक होऊन जातील
एका वितभर पोटासाठी
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि . ३० . ६ . १४  वेळ : ९ . १० रा ऽ   

Marathi Kavita : मराठी कविता


arjun dukre

  • Guest
Re: वितभर पोटासाठी
« Reply #1 on: July 18, 2014, 07:08:30 PM »
kavitra khoop sundar, vastusthiti darshak .