Author Topic: पाऊस कधीचा पडतो..  (Read 574 times)

Offline श्री. प्रकाश साळवी

  • Jr. Member
  • **
  • Posts: 229
  • Gender: Male
  • कवी प्रकाश साळवी
पाऊस कधीचा पडतो..
« on: July 14, 2014, 03:48:08 PM »
घन गर्जत आले मेघ
पाण्याचे टपोरे थेंब
पाऊस कधीचा पडतो,
मन झाले ओलेचिंब    = १ =

झाली धरणी शांत शांत
मेघ आले बरसत
पाऊस कधीचा पडतो
कृषीवल झाला निवांत  = २ =

रस्त्यावर झाले पाणी
टळेल का आता  पाणीबाणी?
पाऊस कधीचा पडतो
आता नको हुलकावणी  = ३ =

पावसाचे झाले आगमन
पुलकित झाले तन मन
पाऊस कधीचा पडतो
आनंद झाला मनोमन = ४ =

श्री प्रकाश साळवी दि १२ जुलै २०१४

Marathi Kavita : मराठी कविता