Author Topic: प्रतिबिंब ...  (Read 1023 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,268
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
प्रतिबिंब ...
« on: July 17, 2014, 11:54:08 AM »पाहण्या प्रतिबिंब आपुले
गिरी रांग आतुरलेली,
ठरवून कक्षा जळाची
नभांनी स्वतः व्यापलेली !

कुंपण नक्षी खडकांची
डुंबण्या ती सरसावलेली,
तरूपर्णें सोबत एकमेंका
ठेऊनी नजर रोखलेली !

काया, नील जलाची
मेघ वस्त्रे ल्यायलेली,
निशब्द, निरंव आपुल्या
ध्यानात शांत पहुडलेली !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता