Author Topic: पुष्प छंद...  (Read 876 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,269
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
पुष्प छंद...
« on: July 17, 2014, 12:41:53 PM »
केवडयाचा गंध 
केव्ह्ढासा संग?
दरवळे अंग अंग !

रंगात वैविध्य
गुलाबाचा सुगंध
काटयांशी संग !

मोगरा शुभ्रांग
मोकळ्यात मंद
गजऱ्यात बेधुंद !

पितकेशरी रंग
पाकळीत कंद
झेंडू देई आनंद !

त्रीरंग विविध
नित्य जास्वंद
देव्ह्राऱ्यात दंग !

पाहताच आनंद
चाफा सोनरंग
मंद स्वर्गीय गंध !

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता