Author Topic: @@@ बाप @@@  (Read 1030 times)

@@@ बाप @@@
« on: July 18, 2014, 12:33:55 AM »
@@@ बाप @@@

बाप नावाचं माझं पान नेहमी कोरं राहिलं
माझ्याच अश्रूंनी ते ओलं राहिलं .....................
शाळेत निबंध खूप लिहिले फक्त आईवरच
बापासाठी पान माझं मोकळं असायचं
ज्याला कधी मी पाहिलंच नाही त्यावर काय बर लिहायचं

मी वर्षाचा असतानाच तो देव घरी गेला , जगासाठी तो मेला
पण मला वाटायचं माझ्यासाठी तो खाऊ आणायलाच गेला
पुन्हा कितेकदा मी त्याला फक्त फोटोतच पाहिलं
बाप नावाचं माझं पान नेहमी कोरं राहिलं
माझ्याच अश्रूंनी ते ओलं राहिलं ......................

शाळेत दुसरी पोरं बाच्या सायकलीवरून येताना पाहिली कि मन एकटच रडायचं
कधी येईल माझा बाबा असं मनातच म्हणायचं
आईनं आख्खा आयुष्य माझासाठी वाहिलं
दर वेळेला मी बापाला तिच्यातच पाहिलं
बाप नावाचं माझं पान नेहमी कोरं राहिलं
माझ्याच अश्रूंनी ते ओलं राहिलं ......................

नोकरी गेल्यावर खांद्यावर कोणी हात ठेवणारं हवं होतं
पहिल्यांदा पियुन घरात गेल्यावर , रागावणारं कोणी हवा होतं
आईनं भरभरून माया दिली , पण धाक कुणाचा नाही राहिला
दर वेळा बापाचा कप्पा रिकामाच राहिला
आज पर्यंत मला कोणीच रडताना नाही पाहिलं
बाप नावाचं माझं पान नेहमी कोरं राहिलं
माझ्याच अश्रूंनी ते ओलं राहिलं ......................

गावाकडल्या माणसांकडून त्याच्याबद्दल खूप ऐकलं होतं
माणूस म्हणून तो ग्रेट होता इतकाच मला कळलं होतं
त्याच्या सारखा माणूस अक्ख्या गावात नाही
तुझा बाप म्हणजे राजा माणूस ,
असं ऐकलं कि उर भरून यायचं , न काळात डोळ्यात पाणी यायचं
मग त्याच्या समाधी वर जाऊन एक फुल वाहिलं
बाप नावाचं माझं पान नेहमी कोरं राहिलं
माझ्याच अश्रूंनी ते ओलं राहिलं ......................


विक्रम पाटील दिग्दर्शक

Marathi Kavita : मराठी कविता


yogeshchava

  • Guest
Re: @@@ बाप @@@
« Reply #1 on: July 18, 2014, 01:11:47 AM »
लय भारी

Offline भूषण कासार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 70
  • Gender: Male
  • जीवन फार सुंदर आहे.....
Re: @@@ बाप @@@
« Reply #2 on: July 18, 2014, 05:58:55 PM »
Shabdach nahi mitra .....