Author Topic: @@@ नाते @@@@  (Read 1042 times)

@@@ नाते @@@@
« on: July 20, 2014, 02:58:05 PM »
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

लहानपणी खूप खोड्या करायचो
आणि आईच्या पदरामागे लपून बसायचो
आईचा मार खाउन रडणे मला उमगले ,,
पण रात्री झोपेत कोण मलम लावले
ते कधीच ना कळले
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

दाद्याची दादागिरी दिसायची ,,,,,,,
त्याचं कौतुक जास्त हेच मला आयुष्भर उमजले
माझ्या वर नेहमी अन्याय च हेच मला कळले
पण माझ्या साठी कोणी शाळा सोडली ,,,
कोणी कोवळ्या वयात कामाची वाट धरली ,
हे कधी न कळले ,,,,,
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

चुगालोखोर ताई ,,
तिला प्रत्येक गोष्टीची घाई
तिच्या लग्नात खूप नाचलो ,, मी
दाजी ला पाहून खूप छान वाटले ,, मन पाखरासारखे फुलले
पण ताई जाताना मन का रडले ,,,,, डोळे पाण्यानी का भरले
हे कधीच न कळले ,,,,,,,,,
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

लग्नात मी खूप खुश होतो
बायकोच्या नादातच गुंग होतो
अक्षता पडताना आईकडे लक्ष गेले होते
अचानक आईच्या डोळ्यात पाणी का आले होते
हे कधीच न कळले ,,,,,,मला
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

इतकी खुश असणारी बायको
जाताना अचानक का रडू लागली ,,,
तिच्या आईच्या गळ्यात गले घालून
माहेर सुटत न्हवत तरी तिचे पाऊल इकडे का वळले
हे कधीच न कळले ,,,,,,मला
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

आयुष्यभर वाईट वागूनही ,,
तीन फक्त प्रेम दिलं ,,,,
आई असो किंवा बायको दोघींनीही सेम दिलं
पण कोणाचा प्रेम जास्त मोठं होतं अजूनही मला कळले नाही
ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

ना हे कळले,,, ना ते कळले,,,,
आयुष्यात येवून आयुषच मला कळले नाही
आयुष्यात कोणतेच नाते मला ना कळले

विक्रम पाटील दिग्दर्शक

Marathi Kavita : मराठी कविता


amol waghule

  • Guest
Re: @@@ नाते @@@@
« Reply #1 on: August 02, 2014, 09:57:53 PM »
Khup khup chaan ahe. Like it.