Author Topic: शुद्ध सोवळा श्रावण  (Read 492 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
शुद्ध सोवळा श्रावण
« on: July 29, 2014, 10:28:58 AM »
शुद्ध सोवळा श्रावण
माझ्या दारावर आला
निसर्ग होता आतुर
कधीचा तया भेटण्याला

धरणी न्हाली सचैल
ल्याली आज नवा शेला
मरगळ जाऊन हिरवळ आली
त्याच्या दिमतीला

धावत आले झरे रुपेरी
तया भेटण्याला
आगमनाने सृष्टीला
आनंद अती झाला
.........शैलेश हिंदळेकर

Marathi Kavita : मराठी कविता