Author Topic: माणूस काही मिळत नाही  (Read 749 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
माणूस काही मिळत नाही
« on: July 29, 2014, 08:25:34 PM »
माणूस काही मिळत नाही
===================
मुखवट्या आडचा चेहरा
कधीच ओळखता येत नाही
वाटतं हा माणूस आहे
माणूस काही भेटत नाही 

कां वागतो असे माणूस
मला काही कळत नाही
विसरून जातो तो उपकार
स्वार्थ साधल्यावर ओळखत नाही

नेहमीच होतो माझा वापर
तरी अक्कल येत नाही
असा कसा मी घडलो
माझे मलाच कळत नाही
 
स्वार्थापुरती गोड बोलुनी
मी हि जातो तत्काळ विरघळुनी
नेहमीच मी नाडला जातो
तरी जित्याची खोड जात नाही

असा कसा भोळ्या मनाचा
वसा मला दिला तू देवा
माणूसपण शोधतो या जगी
माणूस काही मिळत नाही
===================
 संजय एम निकुंभ , वसई
दि.२९. ७. १४  वेळ : ८.१० रा .   

 

Marathi Kavita : मराठी कविता