Author Topic: आकाशातील शाळा  (Read 642 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
आकाशातील शाळा
« on: July 30, 2014, 12:42:38 PM »
आकाशातील शाळा सुटली
वर्गांतुनी ढग धावत आले
गडबड गोंधळ किती उडाला
कडकड भांडण वीज कडाडे
 
कुणी लठ्ठ तर कुणी बारके
व्रात्य कुणी तर कुणी बावळे
भिन्न भिन्न तरी एकरूप ते
रंग तयांचे काळे काळे
 
तोच अचानक वारा गुरुजी
छडी घेउनी धावत आले
बघता त्यांना मुले पळाली
शाळा, आंगण पुन्हा मोकळे
 

केदार...

Marathi Kavita : मराठी कविता