Author Topic: देहावर पडणारी पाल....  (Read 578 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
देहावर पडणारी पाल....
« on: August 02, 2014, 09:23:48 PM »


त्याची ,
पहिली प्रतिक्रिया
असते नकाराची
सहज टाळण्याची
पण..
वयाचे समजुतदारपण
पैशाचे शहाणपण
व्यवहाराची लागण
त्याला ,
घ्यायला लावते यु टर्न
त्याचं
उसन हसण
उसन वागण
माझ्या
येते अंगावर
नको असून
देहावर पडणारी
पाल होवून

विक्रांत प्रभाकर



 
« Last Edit: August 03, 2014, 12:45:05 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता