Author Topic: पावसाची नैतीकता  (Read 593 times)

Offline Pravin R. Kale

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  • Gender: Male
पावसाची नैतीकता
« on: August 05, 2014, 02:37:58 PM »
पावसाची नैतीकताही
फिरल्यासारखी वाटते
कधी ढगफुटी
तर कधी
आभाळच कोसळते

पावसाच्या थेंबानी
डोंगर कोसळताना
त्याच डोंगराखाली
संपूर्ण गाव
गाडून जाताना
पावसाची नैतिकताही
फिरल्यासारखी वाटते

मग अशावेळी
नकोसाच वाटतो
असा पाऊस
पाहवतच नाही
कित्येकांना गाडणारा
पावसाचा हैदोस


Pravin Raghunath Kale
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता