Author Topic: पाऊस  (Read 846 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
पाऊस
« on: August 06, 2014, 07:50:19 PM »
नाही नाही म्हणत
कित्येक दिवसानंतर
पाऊस आज बरसला
त्या पावसाच्या येण्याने
खरचं किती आनंद
झाला असेल चातकाला

भेगा पडेपर्यंत सुकलेली
ती काळी मातीही
पावसाने ओलावली असेल
दुष्काळाने कंटाळलेला
तो शेतकरीही
जोमाने जमीन कसेल

पैशाच्या मागेपुढे धावणारा
हा स्वार्थी माणूस
आपली नीती जरी विसरला
सकल भूमंडळीचा उद्धारकर्ता
तो पाऊस
आपल काम नाही विसरला
थोड्या उशिराने का होईना
पाऊस जोमाने बरसला


Pravin Raghunath Kale
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता