Author Topic: कैफियत...  (Read 607 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कैफियत...
« on: August 09, 2014, 01:14:35 AM »
कैफियत...

पैसा नाही म्हणे आमच्याकडे
उघडे वाघडे गरीब फीरतात,
कापडही पडते महाग काहींना
नेते सोन्याचे कपडे वापरतात !

नेते खरोखर नेतेच  झाले
निवडणुकीत सारे मते नेतात,
पदावर वा जावून समितीवर
कमवून आपली घरे भरतात !

निवडून घ्यायचे काही 'खास'
खेळाडू कलाकार, मात्र नावाला,
गैरहजर, अबोल राहून  काही
कोटा पुरा संसदेत करायला !

सवलतींचा पाऊस त्यां साठी
कात्री सामान्यांच्या खिशाला,
तरीही होतो ऊदोऊदो त्यांचा
जाणिव का नाही सरकारला?

©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता