Author Topic: जे हि राज्यकर्ते आले ते लुटत गेले  (Read 644 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
जे हि राज्यकर्ते आले ते लुटत गेले
=================================
सव्वा कोटीचा सोन्याचा शर्ट घालून
आम्ही खरे राष्ट्रवादी हे दाखवून दिले
काडीची किंमत नाही शरद रावांना
हेच पंकज पारख यांनी दाखवून दिले

याआधीची राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका यांच्या पतीने
साडेतीन किलोचा शर्ट घालून गिनीज बुकात नावं केले
पुण्याच्या या दत्ता फुगेंनी संपत्तीचे असे
ओंगळवाणे प्रदर्शन करून माज आल्याचे जाहीर केले

नगर सेवकापासून , आमदार , खासदार यांनी
समाजसेवेच्या नावाने आपलेच भले केले
अन शरद पवार म्हणतात
शेतकऱ्यांनीच मला निवडून न देता घरी बसवले

कुणी बांधले बंगले , कुणी मोठे महाल उभारले
पेट्रोल पंप अन उद्योगांनी यांचे दिवटे मोठे झाले
शिक्षणाच्या नावाखाली धंदे उभारून यांनी स्वतःचे खिसे गरम केले
जितके लुटता येईल हावरटा सारखे लुटत गेले

जमिनींच्या किमती वाढल्या सारे बिल्डर झाले
समाजसेवेचे भान हरपून पैसा ओरबाडत राहिले
केंद्राचा पैसाही न वापरता परत पाठवू लागले
पैशापायी , स्वार्थापायी नेते आंधळे झाले 

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊन माणसाचे काळीज रडले
यांनी कृषी मंत्री असूनही डोळ्यांवर हात ठेवले
आपलाच शेतकरी मरतो आहे संसार उध्वस्त होतो आहे
तरी हे क्रिकेट अन राजकारणात मस्तपैकी मश्गुल राहिले

वाटत होतं यांनी पंतप्रधान व्हावं देशाला पुढे न्यावं
पण यांच्याच नेत्यांनी फक्त स्वतःचे उखळ पांढरे केले
आता कुठल्या तोंडाने म्हणतात महाराष्ट्र पुढे आहे
या सरकारने निष्क्रिय राहून जनतेचे शाप घेतले

कॉंग्रेसने तर सत्ता भोगून जनतेस पुरते नागडे केले
धर्मांधता उराशी बाळगत  धर्मनिरपेक्षतेचे सोंग केले
जनता राहिली नेहमीच उपाशी जनतेचे हाल झाले
जे आले राजकारणात त्यांनी हात साफ केले

प्रत्येक राज्याने कर्जाचे डोंगर उभे केले
राज्यकर्ते झाले करोडोपती जनतेस भिकेस लावले
आव्हान करतो मी कुठेल्याही सरकारला त्यांनी हे करून पहावे
हि हरामाची मालमत्ता जप्त करून राज्यास कर्जातून बाहेर काढावे

यांचीच मालमत्ता कशी आयकर खात्यास दिसत नाही
फक्त नोकरदारांना आयकर वाल्यांनी लुबाडत नेले
कुठे कायदे , अन कुठे आहे लोकशाही
ज्याने त्याने स्वार्थासाठी यांना फक्त वापरून घेतले

खरचं असेल यांना देशाची अन जनतेची काळजी
यांनी संपत्तीचे हवन करून साधे रहाणे पसंद करावे
पण हे असे करणार नाही हे काही देशभक्त नाही
यांच्यात चढाओढ लागलीय संपत्तीसाठी हेच देशास घातक आहे
===========================================
संजय एम निकुंभ , वसई ,दि. ११. ८. १४  वेळ : ७. ०० संध्या .