अजूनही....
शोधू शकलो नाही
तुझ्या नजरेतला छंद
हृदयातला तळ
तुझ्या श्वासांचा गंध
वाटत....
तू नक्कीच शोधलं असशील
माझ्या नजरेतला भोळेपणा
हृदयालील कळ
माझ्या श्वासातील हळवेपणा
तू माझ्यासाठी कधीच हसली नाहीस
माझ्यावर हसलीस
माझ्या भावनांशी खेळलीस
फक्त तुझा हव्यास म्हणून !
हे भावनांचं जग फसवं असत
या जगात फसवता येणं फार सोपं असत
आणि,फसणं त्यापेक्षाही सोपं
म्हणून ...
मी फसलो ,तू फसू नकोस
माझा खेळ झाला,
तुझा होऊ देऊ नकोस
मी चुकलो म्हणून,तू चुकू नकोस
अजूनही वाटत....
केव्हातरी बदलेल
तुझ्या नजरेतला छंद
गाठू शकेन हृदयातला तळ
केव्हातरी दरवळेल
माझ्या आठवणींनी तुझ्या श्वासांचा सुगंध
मी अजूनही त्याच भ्रमात आहे
अजूनही .......
- rudra