Author Topic: नांगरण. . . .  (Read 551 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
नांगरण. . . .
« on: August 16, 2014, 12:01:24 PM »
नांगरण. . . . .
 
 काळ्या भोर रानात नांगरणीची येळ
 तापत्या उनात सहा बैली जोड,
 पोटातही डोंब पाण्याचा नाही थेंब
 भुरट्या डोंगरात माळही वाळुन कोळ. .
 
 ढेकळा ढेकळाला चिरा पटकुराला पडल्यावनी
 बापाचेबी हाल काळ्या माई वानी. .
 
 येत्यात ती दिस काडावी लागत्यात
 कुटक्या वीनाबी भुका भागवाव्या लागतात. .
 
 आग इतकी . .
 पायाच्या लाह्या व्होतात
 हिरी बारवा. .
 तटातटा पान्हा चोरत्यात
 तरीबी साती आसरा. .
 हिरीकाटी दगडावानी गच पडुनच असतात. .
 
 नांगरण सरन तळपत्या उनात
 मोती पिकल का सुगीच्या दिसात. .
 
 मुका जीव कधी शांत होईल
 गवताच्या कुशीत झोकुन देईल
 माळालाही फुटल नवतीचा मिसुर
 ज्वारी जवानीतली बघुन. . .
     
-- शिवप्रभा गिरी

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
Re: नांगरण. . . .
« Reply #1 on: August 18, 2014, 11:02:04 AM »
दिस दिस राबून
शेतकरी उपाशीच राहिला
कळतच नाही मला
हे आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिला