|| संध्या ||
रंग मनोहर
किंचित केशर
छठा पसरली सोनेरी
ऊन कोवळे
रान मोकळे
झाडी हिरवी पैलतीरी
गर्द निळे
बेभान तळे
गगन भिडाया आतुर
वारा गंधित
करितो रंगीत
रानफुलांचा मधुबहर
रंगात चिंब
भिजले जे रंग
रंगातून उगवे रंग नवा
संघात धुंद
बांधून छंद
पक्षांचा उधळे गगनी थवा
रंगांनी भिजली
संध्या सजली
पैलतटावर छठा नवी
कोण पुकारी
दूर शिवारी
साद घालितो कुणी कवी !!
- गौरव मोडक