हॉस्पिटल
औषधांची विपूल रेलचेल
नातलगांची नकोशी ये-जा,
असहाय्य पेशंट खेळणं
सराईत डॉक्टरच्या हातचा.
General, ICU, Special
Ward तरी किती,
बघुन एकेक Equipment
वाटायला लागते भिती.
असो कुठलीही अवस्था
बालपण, तारुण्य वा म्हातारपण,
आपल्याला करते फक्त निराश
येते जेव्हा कधी हे आजारपण.
काही सात्वंन करतात
तर काही घाबरवून सोडतात,
स्वत:च्या अनुभवांची मग
कथाच सांगत सुटतात.
बघून बिलाची रक्कम
जो तो पडतो चाट,
सरकारी असो वा खाजगी
पेशंटची लागते पुरती वाट.
- संतोषी साळस्कर.