Author Topic: राहीला आता फक्त ईद्रंधनुचा कबिला ।  (Read 739 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
झुळूक वा-याची
क्षणभरात घेऊन आली
ओठावरती लाल लाली ।
गालावरती फुलली ,
गुलाबाची सुदंर कळी ।
हास्य फुलवूनी क्षणार्धात
पाला पाचोळा घेतला वाहुनी ।
मेघ गर्जनांची झाली मोठी आरोळी .
साद घातली पर्जन्यांनी
तन मन सारे धुवून निघाले,
क्षणात रंगले जिवन सारे ।
कात टाकुनी नैराश्याची,
तन मन फुलले सारे ।
किती दिन किती रात
वाट पाहत होते या घटीकेची,
क्षण क्षण होता मजला भारी ।
स्वप्न रंगवीले होते मनी,
आज मिळाली पंख नवी ।
सुरवंटातुनी बनली फुलपाखरे
मुक्त विहारा आकाश वनी ।
पाला पाचोळा जिवनाचा
वाहूनी गेला सारा
राहीला आता फक्त ईद्रंधनुचा कबिला ।

सोनाली पाटील.