Author Topic: माणसाने माणूस होऊन जगावं  (Read 1309 times)

Offline SANJAY M NIKUMBH

  • Full Member
  • ***
  • Posts: 502
माणसाने माणूस होऊन जगावं
======================
स्वतःच मन सुंदर करावं
कुणाचही काळीज जिंकता येईल
असं वागावं

कमळ नाही कां चिखलात उमलत
तरी त्या कमळा सारखं
कुणासही आवडावं

जीवनात भेटणारच मोहाचे काटे
मोह मायेस झिडकारून
मार्गस्थ व्हावं

जो रस्ता दिसतोय मळलेला
तो रस्ता सोडून
आयुष्य सुंदर बनवावं

माणसाचा जन्म एकदाच भेटतो
जात , धर्माचा विचार न करता
माणसाने माणूस होऊन जगावं
माणूस होऊन जगावं
======================
संजय एम निकुंभ , वसई
दि. ३०. ८. १४  वेळ : ९. ३० रा .

Marathi Kavita : मराठी कविता


Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
Re: माणसाने माणूस होऊन जगावं
« Reply #1 on: September 11, 2014, 09:54:41 PM »
ही सुंदर कविता लिहिणारा कवी मित्र आपल्याला परवा अपघतात सापडून सोडून गेला