Author Topic: शब्दा साठी.....  (Read 764 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
शब्दा साठी.....
« on: September 05, 2014, 04:05:14 PM »
शब्दांचेच ऋणी आम्ही
शब्दांचेच धनी ।
शब्दासाठी लढता लढता
देऊ आपल्या प्राणांचे बली ।
शब्दा साठी जगतो आम्ही
शब्दासाठी मरतो ।
शब्दासोबत जगताना
यावे भाव अतंरातुनी मनी ।
शब्दा संगे खेळतो आम्ही
शब्दासव हसतो रडतो ।
घायाळलेल्या भावनांनवरती
शब्दांचीच फुंकर घालतो ।


सोनली पाटील

Marathi Kavita : मराठी कविता