Author Topic: मांजरीचा श्रावण  (Read 498 times)

Offline vilas shahasane

  • Newbie
  • *
  • Posts: 5
मांजरीचा श्रावण
« on: September 22, 2014, 08:41:34 PM »
किटी नावाचे एक होते मांजर
मनी त्याच्या काय आले त्याने पाळला बाई श्रावण
मांजरीला ठाऊक होते गणपतीची पूजा करून सोडतात बाई श्रावण
महिनाभर मांजराने नुसत्या खाल्या भाज्या
भाज्या खाऊन मांजराला मोठी वाटली सजा
कंटाळले बाई मांजर कधी संपेल श्रावण
भाज्यांबरोबर रोज रोज नको वाटत घावन
संपला एकदाचा श्रावण झाले गणपतीचे आगमन
पूजा करून मांजर म्हणाले सोडते आता श्रावण
तृप्त होऊ खाऊन आता माशांचे कालवण
ताजे मिळाले मासे मस्तच झाले कालवण
मनोमनी मांजर म्हणाले नको नको त्या भाज्या नको ते घावन
मी बाई आता कधीच पाळणार नाही श्रावण
सौ.मनीषा विलास शहासने.

Marathi Kavita : मराठी कविता