Author Topic: उगा किती रे पळणे बाबा  (Read 491 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
उगा किती रे पळणे बाबा
« on: September 23, 2014, 12:32:08 PM »
उगा किती रे पळणे बाबा 
इथेच जगणे..... मरणे बाबा
 
साथ तुझ्या न जाइल काही
इथेच करणे..... भरणे बाबा
 
धर्म पाहुनी आंगरख्याचा
इथेच जळणे..... पुरणे बाबा
 
नाव ''केदार'' टिकण्या साठी
इथेच झिजणे..... उरणे बाबा
 
मोक्ष मिळो मज तव चरणांशी
इथेच धरणे.... धरणे बाबा
 
 
केदार...

Marathi Kavita : मराठी कविता