Author Topic: विकला देश आमचा ..  (Read 487 times)

Offline Çhèx Thakare

  • Full Member
  • ***
  • Posts: 517
  • Gender: Male
  • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
    • https://www.cthakare.blogspot.com
विकला देश आमचा ..
« on: October 17, 2014, 11:47:59 PM »
विकला देश आमचा ... ( कविता )

बनले गिधाड कर्मा ने
विझविल्या मशाली जाणिवेच्या
जाळून भावना माणूसकी च्या
भाड्यांनी विकला देश आमचा

ईथली माती यांनी विकली
विकली वेशी वरची रास
बांधून गुडघ्याला तो साज
भाड्यांनी विकला देश आमचा

विकली भोळी माय यांनी
यांना काय जाण तिची
ऊडवली लक्तर तिची चव्हाट्यावर
तुडवली शान त्या जननीची

अरे ऊडवा चिंद्ध्या यांच्या
द्या कठोरातली कठोर यांना सजा
अरे मारा त्या भडव्यांना
ज्यांनी देश विकला आमचा
ज्यांनी देश विकला आमचा

©  चेतन ठाकरे

Marathi Kavita : मराठी कविता