Author Topic: ।। विदर्भ कट्टा ।।  (Read 575 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
।। विदर्भ कट्टा ।।
« on: October 18, 2014, 11:33:18 AM »
राजे रजवाडे आणि भोसल्यांची शान
भारताच्या केंद्रबींदूचा मीळाला ज्याला मान
आॅरेंज सीटी म्हणून जग ज्याला ओळखतं
असं हे आमचं नागपूर महान....

झर झर वाहतो इथे पाण्याचा झरा
विदर्भाचे स्वर्ग म्हणजे आमचा चिखलदरा....
हीरवा शालू नेसलेले हे आमचे मेळघाट
तर अमरावती त शोभतो अंबादेवीचा थाट.....

शेगावी इथे वसते गजानन माऊली
साक्षात भोळ्या विठोबा ची सावली
अहिंसेचा धडा देण्यास महात्मा जीथे अवतरले
असे हे वर्धा जिल्ह्याचे सेवाग्राम भले.....

दुर्मिळ प्राण्यांनी सजलेले ताडोबा चे सुंदरवन
आचार्य विनोबा भावे यांचा पवनार येथील
आश्रम.....
कुष्ठरोग्यांचे झाले जीथे प्रेमाने संगोपन
असे हे वरोरा चे बाबा आमटें चे आनंदवन.....

अकरा जिल्ह्यांनी नटलेला हा विदर्भ पट्टा
वऱ्हाडी भाषेत सजलेल्या मेहेफीलींचा कट्टा
माणसाने जपलेला माणुसकीचा संदर्भ
असा हा आमचा मराठ्यांचा विदर्भ...

Marathi Kavita : मराठी कविता