दुडूदुडू धावायचं असतं
मिळेल ते खायचं असतं
झोप आली की निवांतपणे आईच्या
कुशीत झोपायचं असतं
शाळेमध्ये जायचं असतं
नाही आले लिहायला तरी
खडूने पाटीवर गिरवायचं असतं
कॉलेजमध्ये जायचं असतं
नाही आलं इंग्रजी तरी
आय लव्ह यू म्हणायचं असतं
प्रेमात कुणाच्या पडायचं असतं
शुभमंगल झालं की
पतीपत्नी बनायचं असतं
बाप मुलांचं बनायचं असतं
एक किंवा दोन झाले की
कुटुंबनियोजन करायचं असतं
जपून थोडंसं वागायचं असतं
वयोमान पूर्ण झालं की
निश्चिंत झोपायचं असतं
- गौरव सुवेर्, साठ्ये कॉलेज