Author Topic: लेखनी  (Read 434 times)

Offline सुमित

  • Newbie
  • *
  • Posts: 25
लेखनी
« on: October 23, 2014, 10:12:58 AM »
जादू कि किमया म्हणावी या लेखणीची
हिच्यामुळे वाताहत झाली किती राजवटींची

हिने एक शब्द फिरवला आणि
सांगता झाली पेशवाई ची

ज्यांच्याकडे हि नांदली ते थोर
हि कधी शेक्सपिअरची तर कधी कुसुमाग्रजांची

महान किती हिचा महिमा
प्रतिमाच बदलली हिने दलित समाजाची
हिनेच गिरवली राज्यघटना भारताची

अभिमान मित्रानो मलाही
पाहुण्यासारखी येऊन जाते हि माझ्याही घराशी
आणि नकळत उकल करून जाते भावनांची ..

सुमित 9867686957

Marathi Kavita : मराठी कविता