Author Topic: स्वर अनामीक  (Read 523 times)

Offline सूर्य

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
स्वर अनामीक
« on: October 25, 2014, 08:15:51 PM »
एक काटा मला आवडू लागला ..!
 जीव माझा तुझ्यावर जडू लागला ..!

अर्थ कळनार नाही इशारा हवा ,
 शब्द ओठा मध्ये जर दडू लागला .. !

स्पर्श होता तुझा दर्वळे ही जखम ,
 रोज अपघात माझा घडू लागला …!

 छेडली ही कुणी तार हृदयातली ,
 स्वर अनामीक का सापडू लागला …!

 स्वैर करणार जो सर्व दाही दिशा ,
 चालणारा खरे तर उडू लागला ...!

 दूर गेलीस तू मानले मी खरे ,
 एक अश्रु तुझाही रडू लागला  ...!

 तू मला चाखले गोड झालीस तू ,
 ओठ माझा मला मग कडू लागला ...!

 काय दुनिया अमानुष अशी वागते ,
 एक तारा नभी  बडबडू लागला …!


 संदीप पाटील (सूर्य)9892911617

Marathi Kavita : मराठी कविता