Author Topic: ......अगदी मनापासून.  (Read 975 times)

Offline Surya27

  • Newbie
  • *
  • Posts: 18
......अगदी मनापासून.
« on: October 25, 2014, 11:31:00 PM »

मी कुणावरही प्रेम करतो...अगदी मनापासून.
प्रेमात स्वार्थ नाही शोधू शकत मी.
प्रेम म्हणजे काही देण लागत.
प्रेम म्हणजे फक्त घेणच नव्हे.
म्हणून ज्यांच्यावर मी प्रेम करतो त्यांना मी मानसिक रोगी वाटतो.

मी कुणावरही विश्वास करतो....अगदी मनापासून.
कुणी आपलंस वाटल तर विश्वास ठेवतो.
विश्वासासारखा मोठा आधार नाही.
विश्वास नसला कि सगळ संपत.
म्हणून ज्यांच्यावर मी विश्वास ठेवतो त्यांना मी मानसिक रोगी वाटतो.

मी माझ्या मनाच ऐकतो.....अगदी मनापासून.
मनाला पटेल तेच मी करतो.
मनाला योग्य नाही वाटले तर टाळतो.
मनाच्या विरुद्ध जाण्याचे मी टाळतो.
म्हणून मी इतर जे सांगतील ते नाही करत त्यांना मी मानसिक रोगी वाटतो.

मी माझ्या मनातल बोलतो......अगदी मनापासून.
माझ्या मनात जे असेल तेच मी ओठावर आणतो.
पोटात एक आणि ओठात एक हे नाही जमत मला.
म्हणू बरेचदा मी उद-धट  -गर्विष्ठ वाटतो लोकांना.
म्हणून ज्यांच्याशी मनातल बोलतो त्यांना मी मानसिक रोगी वाटतो.

म्हणून जर कोणी मला मानसिक रोगी म्हटलं,
म्हणून जर कोणी मला psycho म्हटलं,
म्हणून जर कोणी मला पागल म्हटलं 
तर .....मला मान्य आहे ते आणि मी हे .....
ओरडून साऱ्या जगाला सांगीन ...अगदी बेंबीच्या देठापासून.
आणि तेही ........................................अगदी मनापासून.

................................................................................ सूर्या

Marathi Kavita : मराठी कविता


Jyotsna Bhase

  • Guest
Re: ......अगदी मनापासून.
« Reply #1 on: October 27, 2014, 05:02:41 PM »
कुणी आपलंस वाटल तर विश्वास ठेवतो.,,,,,,,,,,,,,,khup kahi ahe ya olimdhe.................n khup chhan aahe Kavita............

Offline Surya27

  • Newbie
  • *
  • Posts: 18
Re: ......अगदी मनापासून.
« Reply #2 on: October 27, 2014, 05:44:18 PM »
धन्यवाद ज्योत्स्ना मैडम ....... अगदी मनापासून.