Author Topic: डाग पडतो या चंद्रावर, तो सूर्य ही त्यास जाळतो  (Read 1264 times)

Offline Shraddha R. Chandangir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 346
  • Gender: Female
स्वप्नात माझ्या येऊन जेव्हा तु मला धूंडाळतो
सुकलेल्या माझ्या गजरयाचा हा मोगरा ही गंधाळतो

आठवणीत तुझ्या मी न्हाऊन नीघते, चकाकते ही काया
कस्तुरीलाही शमवेल असा गंध माझा दरवळतो

धवल तुझे प्रतिबिंब जेव्हा पाण्यावर उमटते
स्पर्श होऊन चांदण्याचा हा झरा ही खळाळतो

क्षण भर बरसूनी हे मेघ तुला लपवतात
आर्त हाक देऊनी, हा जीवही आत कींचाळतो

रवीं-भास्कर नात्याची ऐसी होते ताटातूट
डाग पडतो या चंद्रावर, तो सूर्य ही त्यास जाळतो

- अनामिका