Author Topic: शब्द .......  (Read 819 times)

Offline Surya27

  • Newbie
  • *
  • Posts: 18
शब्द .......
« on: October 30, 2014, 12:22:00 AM »

शस्त्राहुनही तीक्ष्ण धार शब्दांची, वेध घेती थेट काळजाचा
वाणी फक्त निमित्यमात्र, सारा खेळ असतो शब्दांचा 

जखमा होती मनाला, जरी न येती अश्रु लोचनी
होती यातना अंतरात्म्याला, न दिसती पाहता वरूनी

जखमा येतील भरूनी शस्त्राच्या, शब्दांच्या जखमा न भरती
खोलवर राहती व्रण तयांचे, दिसे न जरी व्रण बाह्य अंगावरती

शब्द न बसती एका चौकटीत, शब्दांचे असती अर्थ अनंत
बोलणाऱ्याचे हवे संतुलन , अथवा नात्यांचा होई अंत

बोलणाऱ्याने बोलावे संयमाने ,हे शब्द ना कुणाचे सोबती
सुटलेला बाण अन निघालेले शब्द, पुन्हा न परत घेता येती 
.................................................................. सूर्या

Marathi Kavita : मराठी कविता